अनुसूचित जातीतील मुलींच्या विवाहात होणाऱ्या खर्चाचा बोजा उचलण्यासाठी व सामुहिक विवाह पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'कन्यादान' योजना सुरु केली आहे.
स्थापना
२४ डिसेंबर २००३,१८ डिसेंबर २००८ ( सुधारित )
उद्देश
अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील सामुहिक विवाहात समाविष्ट होणाऱ्या जोड्यांना अर्थसहाय्य देणे.
स्वरूप
सामुहिक विवाह सहभागी होणाऱ्या जोडप्यास १० हजार इतके अर्थसहाय्य वधूचे आई-वाडील व पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याऱ्या संस्था संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे रु . २००० प्रोत्साहनात्मक अनुदन.
अटी व शर्ती
या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी असेल परंतु विधवांसाठी दुसऱ्या लग्नासाठी अनुदेय राहील.
या सामुहिक सोहळ्यात किमान १० जोडप्यांचा समावेश पाहिजे.
वधू व वर महाराष्ट्राचे रहिवासी असवेत.
वराचे वय किमान २१ वर्ष व वधूचे किमान १८ वर्ष असावे.
सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र असावे.
जोडप्याला विवाहापूर्वी झालेले कोणतेही अपत्य नसावे,त्यांचा पुनर्विवाह नसावा .
No comments :
Post a Comment
Thanks for visiting my website