SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Monday, March 21, 2016

अमिताभवर चुकीचं राष्ट्रगीत म्हटल्याचे आरोप

अमिताभवर चुकीचं राष्ट्रगीत म्हटल्याचे आरोप


मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून त्यांच्यावर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ५२ सेकंदापेक्षा जास्त वेळ घेऊन राष्ट्रगीत गायल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, त्यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी ५२ सेकंदाऐवजी १ मिनिट १० सेकंद घेतले.
कोलकातातील ईडन गार्डन्सवर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या, वर्ल्ड टी-२० सामन्यात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटलं होतं, त्यावरून हा वाद आहे.

तक्रारीत नमूद मुददे

अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत ५२ सेकंदाऐवजी १ मिनिट १० सेकंदात गायलं
अमिताभ बच्चन यांनी आपलं संगीताची लय बनवून राष्ट्रगीत गायलं.
अमिताभ यांनी सिंधूच्या जागी सिंह शब्द वापरला, (यात सर्वोच्च न्यायालयाच्या २००५ च्या निर्णयाचं हे उल्लंघन असल्याचं सांगण्यात येत आहे.)
अमिताभ यांनी 'दायक'च्या ऐवजी नायक शब्द वापरलाय, असा त्यांच्यावर आरोप आहे.

No comments :

Post a Comment

Thanks for visiting my website

Map

About Me