SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Thursday, April 7, 2016

श्रीमंत नवरा शोधणाऱ्या मुलीला मुकेश अंबानींचं उत्तर

श्रीमंत नवरा शोधणाऱ्या मुलीला मुकेश अंबानींचं उत्तर

मुंबई : लग्न करताना मुलगा श्रीमंत हवा अशी काही मुलींची अपेक्षा असते. पण, श्रीमंत म्हणजे नक्की किती हे कसं ठरवणार? अशाच एका तरुणीने लग्न करण्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली.

वार्षिक उत्पन्न १०० कोटी असणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याचा तिने चंग बांधला. अशा मुलाच्या शोधासाठी तिने एक पत्र लिहिलं. ज्याला मुकेश अंबानींनी उत्तर दिलं, असं म्हटलं जातंय.

हे पत्र खरंच मुकेश अंबानींनी लिहिलंय का, याची आम्ही खातरजमा केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर इंग्रजीत व्हायरल होणारं पत्र मराठीत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

मुकेश अंबानींना तरूणीने लिहिलेलं पत्र
एका श्रीमंत माणसाशी लग्न करण्यासाठी मी काय करू?
मी इथे जे काही सांगणारे ते अगदी प्रामाणिकपणे सांगणार आहे.
माझं वय २५ वर्ष आहे. मी खूप सुंदर आहे, माझी स्टाईलही चांगली आहे आणि आवडसुद्धा छान आहे. मला अशा व्यक्तीशी लग्न करायचंय ज्याचा वार्षिक पगार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
तुम्ही म्हणाल मी हावरट आहे, पण आजकालच्या जमान्यात २ कोटी वार्षिक उत्पन्न म्हणजे सामान्य समजलं जातं.
माझ्या गरजा जास्त नाहीत. इथे कोणी अशी व्यक्ती आहे का?, ज्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न १०० कोटी आहे? की सर्वांचं आधीच लग्न झालंय?
मी आतापर्यंत ज्यांना डेट केलंय, त्यांच्यापैकी सर्वाधिक कमावणाऱ्या व्यक्तीचे कमाल उत्पन्न ५० कोटी होतं. पण, न्यू यॉर्कमधील सिटी गार्डनच्या पश्चिमेकडच्या भागात जर कोणी राहायला जाणार असेल तर ५० कोटी रुपये उत्पन्न म्हणजे काही जास्त नाही.
म्हणून मला काही प्रश्न आहेत.
१. श्रीमंत व्यक्ती कुठे भटकायला जातात? (त्या जागांची नावं, बारचा पत्ता किंवा जिमच्या नावांची यादी द्या.)
२. मी कोणत्या गटातील व्यक्तींवर माझं लक्ष केंद्रीत करावं?
३. श्रीमंत लोकांच्या पत्नी अगदी सामान्य का दिसतात? मी अशा काही मुंलींना भेटलीये ज्या अगदीच सामान्य दिसतात, त्या इंटरेस्टिंगही वाटत नाहीत. पण, तरी त्यांचा नवरा मात्र फार श्रीमंत आहे.
४. तुमची पत्नी कोण असेल आणि तुमची प्रेयसी कोण असेल याचा निर्णय तुम्ही कशाच्या आधारावर घेता? (मला आता लग्न करायचंय.)
- कुमारी पूजा चौहान
मुकेश अंबानींनी दिलेलं कथित उत्तर
प्रिय पूजा,
मी तू लिहिलेली पोस्ट खूप उत्सुकतेने वाचली. मला वाटतं अशा अनेक मुली असतील ज्यांची ही इच्छा असेल आणि त्यांच्याकडेही असेच प्रश्न असतील. एक गुंतवणूकदार म्हणून मला तुझ्या प्रश्नांचं विश्लेषण करु दे.
माझं वार्षिक उत्पन्न १०० कोटींपेक्षा जास्त आहे, जे तुझ्या अपेक्षा पूर्ण करतं. त्यामुळे मी आशा करतो की, हे उत्तर लिहिण्यात मी माझा वेळ वाया घालवतोय असं कोणाला वाटणार नाही.
एका व्यावसायिकाच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाला, तर तुझ्याशी लग्न करणं हा एक वाईट निर्णय ठरेल. याचं उत्तर अगदी सोपं आहे. ते मी तुला सांगतो.
बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेव, पण, तू तुझ्या सौंदर्याच्या बदल्यात तू पैशांची अपेक्षा करत्येस. 'अ' ही व्यक्ती आपले सौंदर्य द्यायला तयार आहे, तर त्याबदल्यात 'ब'ने आपला पैसा द्यावा, अशी तुझी अपेक्षा आहे, असा हा व्यवहार आहे.
पण, इथे एक खूप मोठी समस्या आहे. कारण तुझं सौंदर्य काळाच्या ओघात नष्ट होईल. माझे पैसे मात्र कोणत्याही ठोस कारणांशिवाय जाणार नाहीत. सत्यस्थिती अशी आहे की, वर्षानुवर्ष माझं उत्पन्न वाढत जाईल, पण तू मात्र तशी सुंदर होत जाणार नाहीस.
म्हणून अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास ,मी मूल्यवर्धित मालमत्ता आहे, तर तुझं अवमूल्यन होत जाणार आहे. हे साधं अवमूल्यन नसेल, तर कधीही भरुन न निघणारं अवमूल्यन असेल, आणि तुझी हिच मालमत्ता असेल, तर मात्र १० वर्षांनी त्याची किंमत आणखी वाईट असेल.
वॉल स्ट्रिटच्या भाषेत बोलायचं झालं तर, व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक 'ट्रेडिंग पोझिशन' असते. तुला डेट करणं ही पण एक ट्रेडिंग पोझिशन आहे.
एखाद्या गोष्टीची व्यापारी किंमत घसरली, तर आम्ही ती वस्तू विकून टाकणे अथवा भाड्याने देणे ही चांगली कल्पना ठरते. तुला जर लग्न करायचं असेल, तर हाच युक्तिवाद लावला जाऊ शकतो.
हे सांगणं खरं तर योग्य वाटणार नाही, पण, योग्य निर्णय घ्यायचा झाला तर मात्र ज्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात अवमूल्यन होतं, ती गोष्ट एक तर विकून टाकावी किंवा 'भाड्याने' द्यावी.
ज्याचं कोणाचं वार्षिक उत्पन्न १०० कोटींपेक्षा जास्त आहे, तो नक्कीच मूर्ख नाही. आम्ही तुला फक्त डेट करू, पण तुझ्याशी लग्न नक्कीच करणार नाही.
मी तुला सल्ला देतो की, तू कोणत्याही श्रीमंत माणसाशी लग्न करण्याचा विचार सोडून दे. आणि हो, तू स्वतः कष्ट केलेस तर १०० कोटी रुपये स्वतः कमवू शकशील, असं करुन तू एखाद्या श्रीमंत मूर्खाशी लग्न करू शकतेस.
हे उत्तर तुझी मदत करेल अशी आशा आहे.
सहस्ताक्षर,
मुकेश अंबानी


MBA Notes,MPSC,News,Health Treatment at Home,

No comments :

Post a Comment

Thanks for visiting my website

Map

About Me