SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Thursday, March 10, 2016

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: मुंबईत आता कचरा डंपिग नाही



जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अखेर मुंबईकर आता कचऱ्यापासून मोकळा श्वास घेणार आहेत. यापुढे मुंबईमध्ये कचऱ्याचं डंपिंग होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय आहे. मुंबईतल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनेच विल्हेवाट लावावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईकरांसाठी आणि मुंबईसाठी हा निर्णय महत्तावाचा मानला जात आहे. मुंबईकरांना आता तुम्हाला मोकळ्या हवेत स्वच्छ श्वास घ्यायला मिळणार आहे. सरकारने तुमची कचऱ्यापासून मुक्ती केली आहे. राज्याच्या देवेंद्र सरकारने यापुढे मुंबईत डंपिंग ग्राउंड नाही असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. आला आणि सूक्या कचऱ्याचं शास्त्रीय पद्धतीने विघटन करा असे आदेश महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे. देवनार डंपिंग ग्राउंडवर लागलेल्या आगीमुळे मुंबईतील कचऱ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्दावरून हायकोर्टानेही सरकारला चपराक लगावली होती. आठवडाभर धुमसत असलेल्या या आगीने आसपासच्या लोकांना त्रास होवू लागला. लोकांना श्वसनाचे आजार झाले. काहींना रुग्णालयातही भर्ती करण्याची वेळ आली. दरम्यान, विधानसभेत मुंबईच्या डंपिंग ग्राउंडचा मुद्दा उचलल्यानंतर, मुंबईचा प्रश्न तर सूटला. पण राज्यात डंपिंग ग्राउंडचा प्रश्न अजूनही सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावरही राज्य सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.

Map

About Me