
युपीएच्या कार्यकाळात विजय मल्ल्यांना कर्ज देण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आहे. एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्यांना वाचवण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. राज्यसभेत या मुद्द्यावर चर्चा होत असताना सरकारची बाजू मांडताना ते बोलत होते. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी विजय मल्ल्याला देश सोडण्यात सरकारने मदत केल्याचा आरोप केला होता. विजय मल्ल्याला 2004 मध्ये बँकिंगची सुविधाही दिली होती. त्यासोबत ललित मोदींही युपीए सरकारच्या कार्यकाळात विदेशात गेले होते असे सांगत जेटलींनी काँग्रेसच याला जबाबदार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, जेटलींच्या आरोपाला उत्तर देत काँग्रेस नेते आझाद यांनी विजय मल्ल्यांना कर्ज देण्याबाबत प्रश्न विचारला नाही तर त्यांनी देश सोडून जाण्यास सरकारने मदत केली? असं स्पष्ट केले. तसेच राहुल गांधी यांनी सरकार आमचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला.