कायदा हातात घेतला तर... गृहराज्यमंत्र्याचा राज ठाकरेंना इशारा
मनसे पक्षाचा काल (बुधवारी) 10 वा वर्धापन दिन होता. यानिमित्ताने मुंबईत आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केलं. भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढत त्यांनी बनावट परवान्या प्रकरणी धमकी दिली. नव्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास, प्रवाशांना उतरवून रिक्षा जाळून टाका असं चिथावणीखोर वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर गृहराज्यमंत्र्यानी आक्षेप घेतला आहे. कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं. हे राज्य कायद्याचं आहे. चिथावणीखोर भाषण आणि आक्षेपार्ह काही असेल तर त्याबाबत पोलीस तपास करून अहवाल देणार असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं.