SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Thursday, March 10, 2016

मुख्यमंत्र्याच्या आश्वासनानंतर डंपर चालकांचे आंदोलन मागे- नारायण राणे

डंपर चालकांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आल्याचं नारायण राणे यांनी जय महाराष्ट्रला सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचं राणेंनी म्हटलं. महसूल विभाग जाचक नियम आणि अटींमध्ये सुधारणा करणार असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं राणेंनी म्हटलं. मुख्यमंत्री आणि खडसेंनी या प्रकरणी दखल घेतली असून त्यांनी आश्वासन दिल्याचं राणे म्हणाले. तसेच सिंधुदुर्गात जावून आंदोलकांशी बोलणार असल्याचंही राणे यावेळी म्हणाले. दरम्यान, डंपर मालकांना पाच पट १ लाख दंड भरावा लागतो. पोलीस पैसे मागतात. महसूलचे अधिकारी दंड आकारत असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं. पोलीस गाड्या अडवणार नाहीत, महसूल विभाग याकडे लक्ष देईल, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. महसूलच्या अटी शिथील होणार अधिकाऱ्यांनी चूकीची कारवाई केली.

Map

About Me